सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर भर
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच श्वान दहन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान आयुक्तांनी कंपोस्ट डेपोमध्ये दररोज संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाची […]

