राजकमल चौकासह विविध ठिकाणी रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या घुमंतूकांच्या प्रश्नावर बैठक; अतिक्रमण व पोलीस विभागाला निरंतर कार्यवाहीचे महापौरांचे निर्देश
शहरातील राजकमल चौकासह प्रमुख चौकांमध्ये वास्तव्यास असलेल्या घुमंतूक कुटुंबांच्या प्रश्नावर महानगरपालिका, पोलीस, आदिवासी विकास आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाची संयुक्त बैठक गुरुवारी घेण्यात आली. घुमंतूक नागरिकांचे पुनर्वसन, शासकीय योजनांशी जोडणी आणि बालकांचे शिक्षण व संरक्षण यासाठी 15 दिवसांत ठोस कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश महापौर श्रीचंद तेजवानी यांनी दिले. महानगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत प्रमुख चौकांमध्ये तात्पुरत्या

