शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँकची सुविधा; प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे कृत्रिम तलावाची सुविधा
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील विविध भागांत

