२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका
अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेला अधिक गती देण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून आज मध्य झोन क्र. २ अंतर्गत राजापेठ परिसरात मोठी वसुली कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराची तब्बल २२ लाख २१ हजार १२६ रुपये इतकी थकबाकी असलेल्या मालमत्तेला महानगरपालिकेच्या पथकाने सील केले. […]



