शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला मनपा शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी भव्य कार्यप्रेरणा शिबिर
आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला चालना देणे आणि शिक्षकांना नव्या शैक्षणिक बदलांसाठी प्रेरित करणे या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने एकदिवसीय भव्य कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिक्षण सभापती अॅड. प्रीतीताई हर्षल रेवणे यांच्या कल्पकता, दूरदृष्टी आणि पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महानगरपालिका संचालित ६३ शाळांतील मुख्याध्यापक […]


