पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम; शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर साथीच्या रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन, जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीचंद तेजवानी […]









