Amravati Municipal Corporation

महानगरपालिका शाळा क्र. 14 वडाळी येथे सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ

महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 14 वडाळी येथे नुकतीच सेवा संकल्प अभियानाला सुरुवात करण्यात आली. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती च्या मुहूर्तावर सदर सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करून विकसित भारत या संकल्पनेवर आधारित उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच प्राथमिक वर्गातील मुलांची रंगभरण स्पर्धा सुद्धा यावेळी पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी

महानगरपालिका शाळा क्र. 14 वडाळी येथे सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ Read More »

मनपात महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री जयंती साजरी

शुक्रवार दिनांक २ ऑक्‍टोंबर,२०२६ रोजी महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. उपस्थित कार्यक्रमानंतर जयस्‍तंभ चौकातील महात्‍मा गांधी यांचे

मनपात महात्‍मा गांधी व लाल बहादूर शास्‍त्री जयंती साजरी Read More »

नगरसचिव संदिप वडुरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अमरावती महानगरपालिकेचे नगरसचिव संदिप वडुरकर हे ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महानगरपालिका आयुक्तांच्या कक्षात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले होते. यावेळी आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते संदिप वडुरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आयुक्त

नगरसचिव संदिप वडुरकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार Read More »

पश्चिम झोनमधील साफसफाई व्यवस्थेचा घेतला आढावा; अधिकारी व कंत्राटदारांची उपस्थिती स्वच्छता, नाला सफाईच्‍या प्रश्नांवर मनपा प्रशासनाचा आढावा

अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासोबतच नाल्यांची नियमित साफसफाईच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी महानगरपालिकेच्या पश्चिम झोनमधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिसरातील स्वच्छता, नाले तसेच उद्यान आणि सार्वजनिक जागांबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. आयुक्त डॉ. मंगेश

पश्चिम झोनमधील साफसफाई व्यवस्थेचा घेतला आढावा; अधिकारी व कंत्राटदारांची उपस्थिती स्वच्छता, नाला सफाईच्‍या प्रश्नांवर मनपा प्रशासनाचा आढावा Read More »

अमरावतीत स्वच्छता व प्लास्टिकमुक्त परिसरासाठी तपासणी मोहीम

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता तसेच प्लास्टिकमुक्त परिसरासाठी जनजागृती व तपासणी मोहीम राबविण्यात आली. अंबादेवी मार्केट व गांधी चौक परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार, वैद्यकीय

अमरावतीत स्वच्छता व प्लास्टिकमुक्त परिसरासाठी तपासणी मोहीम Read More »

अन्सार नगरातील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग; जीवितहानी टळली

अन्सार नगर परिसरातील सुमारे ५ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या अगरबत्ती कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिका अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याची मोहीम हाती घेतली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमरावती महानगरपालिकेचे माननीय आयुक्त मंगेश गोंदावणे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली

अन्सार नगरातील अगरबत्ती कारखान्याला भीषण आग; जीवितहानी टळली Read More »

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत अमरावतीत घरोघरी साचलेल्या कचऱ्याची विशेष मोहीम पूर्ण

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये घरोघरी व परिसरात साचलेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत संबंधित

‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत अमरावतीत घरोघरी साचलेल्या कचऱ्याची विशेष मोहीम पूर्ण Read More »

महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्‍याय जयंती साजरी

शुक्रवार दिनांक २५ सप्‍टेंबर,२०२६ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्‍याय जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. पंडीत दीनदयाळ उपाध्‍याय यांच्‍या जयंती निमित्‍य उपमहापौर सचिन भेंडे यांचे हस्‍ते पंडीत दीनदयाळ उपाध्‍याय यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, ‍सभागृह नेता

महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्‍याय जयंती साजरी Read More »

प्रथमेश तलाव व छत्री तलावाची पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी

अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर आज अमरावती शहरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात व्यापक नियोजन करण्यात आले होते. नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता यावे, यासाठी शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँक, तसेच प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे कृत्रिम

प्रथमेश तलाव व छत्री तलावाची पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी Read More »

शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँकची सुविधा; प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे कृत्रिम तलावाची सुविधा

अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये तसेच विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावी, यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील विविध भागांत

शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँकची सुविधा; प्रथमेश तलाव व छत्री तलाव येथे कृत्रिम तलावाची सुविधा Read More »

Scroll to Top