Amravati Municipal Corporation

२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्‍ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेला अधिक गती देण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून आज मध्य झोन क्र. २ अंतर्गत राजापेठ परिसरात मोठी वसुली कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराची तब्बल २२ लाख २१ हजार १२६ रुपये इतकी थकबाकी असलेल्या मालमत्तेला महानगरपालिकेच्या पथकाने सील केले. […]

२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्‍ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका Read More »

हरित अमरावतीच्या दिशेने महानगरपालिकेचे पाऊल; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाची शपथ

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिका अंतर्गत माझी वसुंधरा अभियान तसेच राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत आज शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मनपा दवाखाना आसिर कॉलनी, तारखेडा, नमक कारखाना मागे वलगाव रोड येथे असलेल्या महानगरपालिका जागेवर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व

हरित अमरावतीच्या दिशेने महानगरपालिकेचे पाऊल; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाची शपथ Read More »

आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सकाळी वडाळी येथील शहरी आरोग्य केंद्र, महानगरपालिका शाळा तसेच टी.बी. हॉस्पिटल मागील शहरी आरोग्य केंद्र व शाळेची पाहणी करून आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणीदरम्यान आयुक्तांनी आरोग्य केंद्रांमधील रुग्णसेवा, औषध

आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिकेची थकबाकीदारांवर कारवाई; दोन मालमत्ता सील

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत गुरुवारी मध्य झोन क्र. २, राजापेठ विभागात मोठी कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या दोन थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. महानगरपालिकेने यापुढेही अशीच कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. महानगरपालिकेकडून प्राप्त

अमरावती महानगरपालिकेची थकबाकीदारांवर कारवाई; दोन मालमत्ता सील Read More »

शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१० हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले (झोन क्र. १) यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये महालक्ष्मी प्रोव्हिजन या

शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१० हजारांचा दंड वसूल Read More »

जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कामाला गती देत झोननिहाय आढावा बैठक आयोजित केली. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी आणि जनगणना कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जनगणना संचालनालयाने नुकत्याच घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात

जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा सुधारण्यासाठी दिले निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज बुधवारी शहरातील विविध आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांचा आढावा घेतला. शहरातील आरोग्य व शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले. आयुक्त वर्षा लड्डा यांनी

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा सुधारण्यासाठी दिले निर्देश Read More »

कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कर विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत महसूल वाढ आणि थकबाकी वसुलीसाठी कठोर व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे झालेल्या बैठकीत कर वसुलीची सद्यस्थिती, थकबाकी वसुली, महसूल वाढ तसेच झोननिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत मालमत्ता कर वसुलीची सविस्तर आकडेवारी सादर करण्यात

कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा Read More »

अमरावती महानगरपालिकेत कार्यालयीन कार्यपद्धती प्रशिक्षण संपन्न

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यालयीन कार्यपद्धती विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महानगरपालिका प्रशासनातील कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडले. प्रशिक्षण कार्यक्रमात महानगरपालिकेतील विविध विभागांचे

अमरावती महानगरपालिकेत कार्यालयीन कार्यपद्धती प्रशिक्षण संपन्न Read More »

आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी

अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी शहरातील विविध दवाखाने व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज, सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी Read More »

Scroll to Top