Amravati Municipal Corporation

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद

भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिन (National Immunization Day – NID) अंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रे, पोलिओ लसीकरण बूथ, बसस्थानके, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विशेष भ्रमणशील पथकांच्या माध्यमातून ० ते

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी; २८ जून रोजी ६७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोहिमेच्या नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला असून शहरातील एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम

अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी; २८ जून रोजी ६७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब Read More »

बडनेरा झोनमध्ये प्लास्टिक जप्ती विशेष मोहीम; 20 आस्थापनांची तपासणी, ₹10 हजारांचा दंड

महानगरपालिकेच्या झोन क्र.4 (बडनेरा) अंतर्गत सूतगिरणी चौक ते गोपाल नगर मुख्य मार्ग परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. मा.आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे झोन क्र.4 यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण

बडनेरा झोनमध्ये प्लास्टिक जप्ती विशेष मोहीम; 20 आस्थापनांची तपासणी, ₹10 हजारांचा दंड Read More »

मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी

शुक्रवार दिनांक २६ जुन,२०२६ रोजी राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्‍ये संपन्‍न झाला. राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते राजर्षि शाहु महाराज यांच्‍या प्रति‍मेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती

मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी Read More »

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने काम करावे – आयुक्त वर्षा लड्डा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध विभागांनी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बैठकीत

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने काम करावे – आयुक्त वर्षा लड्डा Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापालपदी श्रीमती शिल्पा पवार रुजू

अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापाल म्हणून श्रीमती शिल्पा पवार यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी मुख्य लेखापरीक्षक श्री शामसुंदर देव यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती पवार यांच्या रुजू होण्याने महानगरपालिकेच्या आर्थिक व लेखा विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून महसूल व्यवस्थापन, लेखा नियोजन व आर्थिक शिस्त बळकट होण्यास मदत होईल, असा

अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापालपदी श्रीमती शिल्पा पवार रुजू Read More »

अमरावतीत मुसळधार पावसानंतर मनपाची तात्काळ कार्यवाही; नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण

आज शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी अमरावती महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींची दखल घेत महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना राबवून बहुतांश ठिकाणांवरील समस्या निकाली काढल्या. महानगरपालिकेच्या विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रभावी कार्यवाही केली. स्वच्छता विभाग, अग्निशमन विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून पाणी उपसा व निचरा करण्याचे काम हाती

अमरावतीत मुसळधार पावसानंतर मनपाची तात्काळ कार्यवाही; नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण Read More »

अमरावती महानगरपालिका उपायुक्‍त पदी भाग्यश्री बोरेकर रुजु

अमरावती महानगरपालिकेत उपायुक्‍त या पदावर भाग्यश्री बोरेकर ह्या बुधवार दिनांक २४ जुन,२०२६ रोजी रुजु झाल्या. महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा यांची भेट घेवून त्‍यांनी उपायुक्‍त या पदाचा पदभार स्विकारला. त्या भातकुली नगर पंचायत येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होत्या. यापूर्वी भाग्यश्री बोरेकर यांनी अमरावती महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर काम केले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश

अमरावती महानगरपालिका उपायुक्‍त पदी भाग्यश्री बोरेकर रुजु Read More »

एकल महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमरावती महानगरपालिका महिला व बाल विकास विभागाच्या वतीने एकल महिलांच्या सन्मानार्थ व त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले. महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाला

एकल महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न Read More »

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावतीत सामूहिक योगाभ्यास; विविध संस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावती महानगरपालिका आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम येथे भव्य सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावतीत सामूहिक योगाभ्यास; विविध संस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात संपन्न Read More »

Scroll to Top