Amravati Municipal Corporation

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी मोठा उपक्रम | ३१८ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे; ४६२ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ उपचारासाठी संदर्भ

अमरावती महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम साधणारे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्य तपासणी उपक्रमाचा सविस्तर आढावा महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीआरोग्याची वेळेत तपासणी, योग्य उपचार व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा […]

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी मोठा उपक्रम | ३१८ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे; ४६२ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ उपचारासाठी संदर्भ Read More »

दहा वर्षांतील ऐतिहासिक कारवाई; शुक्रवार बाजाराने घेतला मोकळा श्वास

अमरावती महानगरपालिकेतर्फे शुक्रवार बाजार परिसरात दहा वर्षांतील ऐतिहासिक व निर्णायक संयुक्त कारवाई राबविण्यात आली. मा. आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट आदेशानुसार अवघ्या २४ तासांच्या आत नियोजनबद्ध धडक मोहिम हाती घेण्यात आली असून या कारवाईमुळे शुक्रवार बाजार परिसराने अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे. शुक्रवार बाजार परिसरातील अधिकृत व अनधिकृत गाळेधारक तसेच दुकान मालकांची तपासणी

दहा वर्षांतील ऐतिहासिक कारवाई; शुक्रवार बाजाराने घेतला मोकळा श्वास Read More »

अमरावती महानगरपालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन; शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. यानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणात सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. नागरिकांना मौन पाळण्याबाबत

अमरावती महानगरपालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन; शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली Read More »

अमरावती महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक असून, या घटनेमुळे अमरावती शहरात शोककळा पसरली आहे. या दु:खद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत आज शोकसभा आयोजित करून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास

अमरावती महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांची शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सखोल भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर विशेष भर

नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी रुक्मिणी नगर येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सविस्तर भेट देत केंद्रातील आरोग्यविषयक कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान आयुक्त महोदयांनी केंद्रामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांची माहिती घेतली. लसीकरण सत्रांचे नियोजन, अंमलबजावणी व उपलब्धता

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांची शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सखोल भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर विशेष भर Read More »

महानगरपालिका आयुक्तांची शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व अतिक्रमणावर कठोर कारवाईचे निर्देश

शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व नागरिकांसाठी सुयोग्य राहावे यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन सातत्याने ठोस उपाययोजना राबवत असून, त्या अनुषंगाने आज अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील शुक्रवार बाजार, सुंदरलाल चौक, शुक्रवार बाजारातील मटन मार्केट, महादेवखोरी तसेच ऑक्सिजन पार्क या महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी स्वच्छता स्थिती,

महानगरपालिका आयुक्तांची शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व अतिक्रमणावर कठोर कारवाईचे निर्देश Read More »

मा. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात अमरावती महानगरपालिकेला राज्यात पाचवा क्रमांक; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय यश

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मा. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या वतीने करण्यात आले. या मूल्यमापनाचे निकाल प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. या मूल्यमापनात महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये अमरावती महानगरपालिकेने २०० पैकी

मा. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात अमरावती महानगरपालिकेला राज्यात पाचवा क्रमांक; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय यश Read More »

अमरावती महानगरपालिकेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते ध्वजारोहन

अमरावती महानगरपालिकेत भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.) यांच्या हस्ते सकाळी ८.१५ वाजता ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मान्यवर नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, अभियंते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहनानंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी

अमरावती महानगरपालिकेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते ध्वजारोहन Read More »

अतिक्रमण व स्वच्छता विभागाची संयुक्त धडक कारवाई | ३ ट्रक साहित्य जप्त; मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू

शहरातील वाढती अतिक्रमणे व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेता, अमरावती महानगरपालिका आयुक्त माननीय सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. आज सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चित्रा चौक,

अतिक्रमण व स्वच्छता विभागाची संयुक्त धडक कारवाई | ३ ट्रक साहित्य जप्त; मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू Read More »

“गांधी चौकात प्लास्टिकविरोधी कारवाई! २५ आस्थापनांची तपासणी, ₹२,००० दंड वसूल”

अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौ. सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त (झोन क्र. २) श्री. भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक परिसरात प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. झोन क्र. २ (राजापेठ) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान

“गांधी चौकात प्लास्टिकविरोधी कारवाई! २५ आस्थापनांची तपासणी, ₹२,००० दंड वसूल” Read More »

Scroll to Top