श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अनधिकृत अतिक्रमणावर महानगरपालिकेचा कारवाईचा इशारा; संयुक्त पाहणी करून मोजमाप व सीमांकनाचे निर्देश
मौजा जेवड येथील सर्व्हे क्रमांक २७/२ मधील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्याबाबत सूचना व निर्देश देण्यात आले होते. त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याने आज, गुरुवार (दि. २ जुलै २०२६) रोजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाईला गती […]









