All other departments

अमरावती शहराच्या मूलभूत प्रश्नांवर खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रविण पोटे-पाटील यांची आढावा बैठक

अमरावती शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्या, मनपाच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियोजन, अतिक्रमण, फेरीवाल्यांचे प्रश्न, उद्यानांची देखभाल, कंत्राटी मनुष्यबळ तसेच विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे-पाटील, महापौर श्रीचंद तेजवानी, महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले, सभागृह नेता चेतन गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती महानगरपालिकेच्या […]

अमरावती शहराच्या मूलभूत प्रश्नांवर खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रविण पोटे-पाटील यांची आढावा बैठक Read More »

मध्य झोन क्र. २ मधील नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा

अमरावती महानगरपालिकेच्या मध्य झोन क्र. २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांतील नागरी समस्या आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी राजापेठ येथील सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. मध्य झोन क्र. २ च्या झोन सभापती स्वाती कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत स्वच्छता, उद्यान, बांधकाम, मालमत्ता कर, विद्युत तसेच अतिक्रमण या

मध्य झोन क्र. २ मधील नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा Read More »

गणेशोत्सवासाठी अमरावती मनपाची जय्यत तयारी; मंडप परवानगी प्रक्रिया होणार ऑनलाइन

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील उत्सवाचे नियोजन, सार्वजनिक सुविधा आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेश मंडळांना मंडप परवानगी देण्यापासून ते विसर्जनाची व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनापर्यंत विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव

गणेशोत्सवासाठी अमरावती मनपाची जय्यत तयारी; मंडप परवानगी प्रक्रिया होणार ऑनलाइन Read More »

अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२, मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय, आय एम एस उर्दू उच्च प्राथमिक शाळा नागपुरी गेट आणि अमरावती महानगरपालिका उर्दू शाळा क्र.२, अलीम नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला

अमरावती मनपा वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

आसरा माता मंदिर परिसरात आज उपमहापौर मा श्री सचिन भेंडे यांनी वृक्षारोपण लागवड केली

साईनगर येथील नितीनविहार परिसरातील आसरा माता मंदिर येथे उपमहापौर मा श्री सचिन भेंडे यांनी आज मातेची आरती करून वृक्षारोपण लागवडस सुरवात केली. यावेळी त्यांनी सांगितले जागतिक तापमानवाढ (Global Warming) आणि प्रदूषणामुळे ऋतूचक्र बदलले आहे. तीव्र उन्हाळा, दुष्काळ आणि पूर यांसारख्या समस्या वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी ‘एक व्यक्ती, एक झाड’ हा संकल्प करणे गरजेचे आहे.

आसरा माता मंदिर परिसरात आज उपमहापौर मा श्री सचिन भेंडे यांनी वृक्षारोपण लागवड केली Read More »

महानगरपालिका अधिनियम, सभाशास्त्रासह समाजमाध्यम व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण

अमरावती महानगरपालिकेच्या कामकाजात लोकप्रतिनिधींची भूमिका अधिक प्रभावी, सक्षम आणि जबाबदार करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय नगरसेवक व नगरसेविकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी सभागृह, अमरावती येथे ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार

महानगरपालिका अधिनियम, सभाशास्त्रासह समाजमाध्यम व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण Read More »

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बिटप्यून कर्मचाऱ्यांची घेतली आढावा बैठक; नियोजनबद्ध व यशस्वी आयोजनासाठी दिल्या सूचना

अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी व सर्वसमावेशक आरोग्य शिबिराच्या तयारीला वेग आला आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने आज शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महानगरपालिकेच्या बिटप्यून कर्मचाऱ्यांची विशेष आढावा बैठकस्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहात घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. शिबिराच्या

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी बिटप्यून कर्मचाऱ्यांची घेतली आढावा बैठक; नियोजनबद्ध व यशस्वी आयोजनासाठी दिल्या सूचना Read More »

अकोली अंडरपासातील साचलेल्या पाण्याची आमदार प्रवीण पोटे-पाटील यांच्याकडून पाहणी; रेल्वे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना

मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असून, अकोली अंडरपासमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण पोटे-पाटील यांनी आज, शुक्रवार (दि. ३१ जुलै) सकाळी अकोली अंडरपास परिसराला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान आमदार पोटे-पाटील यांनी रेल्‍वेच्‍या अधिकाऱ्यांकडून पाणी साचण्यामागील

अकोली अंडरपासातील साचलेल्या पाण्याची आमदार प्रवीण पोटे-पाटील यांच्याकडून पाहणी; रेल्वे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना Read More »

अकोली अंडरपाससह साई नगर परिसरातील पाणी साचणे, स्वच्छता व नाल्यांच्या प्रश्नांवर महानगरपालिकेत आढावा बैठक

अमरावती शहरात सुरू असलेल्या पावसामुळे अकोली अंडरपास येथे वारंवार पाणी साचण्याची समस्या, साई नगर परिसरातील स्वच्छतेची अपुरी व्यवस्था, नाल्यांची साफसफाई, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी या विविध विषयांवर आज (शुक्रवार, दि. ३१ जुलै) अमरावती महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार

अकोली अंडरपाससह साई नगर परिसरातील पाणी साचणे, स्वच्छता व नाल्यांच्या प्रश्नांवर महानगरपालिकेत आढावा बैठक Read More »

अकोली अंडरपास व साई नगर परिसराची मनपा आयुक्तांकडून पाहणी; पाणी साचण्याची समस्या, नाल्यांची स्वच्छता आणि नागरिकांच्या सुविधांवर भर

शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सकाळी अकोली अंडरपास येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्याची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी पाणी उपसण्याची प्रक्रिया अधिक

अकोली अंडरपास व साई नगर परिसराची मनपा आयुक्तांकडून पाहणी; पाणी साचण्याची समस्या, नाल्यांची स्वच्छता आणि नागरिकांच्या सुविधांवर भर Read More »

Scroll to Top