Amravati Municipal Corporation

आदर्श मतदानासाठी प्रशासन सज्ज; पत्रकारांसाठी ई.व्ही.एम. प्रणालीचे प्रात्यक्षिक; चार मत पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर, मतदारांमध्ये योग्य माहिती व जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने पत्रकारांसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ई.व्ही.एम.) प्रणालीचे प्रात्यक्षिक आज अमरावती महानगरपालिकेत आयोजित करण्यात आले. निवडणूक जाहीर झाल्यापासून दिनांक 15 डिसेंबर 2025 पासून शहरात आदर्श आचारसंहिता लागू असून, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. […]

आदर्श मतदानासाठी प्रशासन सज्ज; पत्रकारांसाठी ई.व्ही.एम. प्रणालीचे प्रात्यक्षिक; चार मत पद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन Read More »

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची गुलाब गार्डनची पाहणी; उद्यान सुशोभीकरण, पर्यावरणपूरक विकास व फेब्रुवारीत भव्य फ्लॉवरिंग एक्झिबिशनचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज कॅम्प रोड येथील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या गुलाब गार्डनची सविस्तर पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी उद्यानाच्या विद्यमान स्थितीचा आढावा घेत सौंदर्यीकरण, दुरुस्ती, नागरिकांच्या सोयीसुविधा व पर्यावरणपूरक विकास यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले. आयुक्तांनी उद्यानातील अंतर्गत रस्ते, हिरवळ, संरचना व उपलब्ध सुविधांची तपासणी करून जुनी व खराब झालेली संरचना दुरुस्त करून

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची गुलाब गार्डनची पाहणी; उद्यान सुशोभीकरण, पर्यावरणपूरक विकास व फेब्रुवारीत भव्य फ्लॉवरिंग एक्झिबिशनचे निर्देश Read More »

ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया सुरळीत सुरू; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सातही झोनमध्ये पाहणी

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियमबद्ध राहावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या झोन क्रमांक १ ते ७ येथील सुरक्षा कक्षांमध्ये ई.व्ही.एम.मधील बॅलेट युनिट (BU) व कंट्रोल युनिट (CU) सिलींग प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली.

ई.व्ही.एम. सिलींग प्रक्रिया सुरळीत सुरू; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सातही झोनमध्ये पाहणी Read More »

पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृतीला प्रभावी प्रतिसाद; स्वीप उपक्रमांतर्गत अमरावतीत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारा अभिनव उपक्रम

अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी वडाळी, यशोदा नगर, उत्तम नगर, चैतन्य कॉलनी, साईनगर व विलास नगर परिसरात पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मतदानाचे महत्त्व, मतदान हा नागरिकांचा कर्तव्यभाव तसेच योग्य उमेदवाराची जाणीवपूर्वक निवड करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. पथनाट्यांद्वारे सोप्या व प्रभावी शैलीत

पथनाट्याच्या माध्यमातून मतदार जागृतीला प्रभावी प्रतिसाद; स्वीप उपक्रमांतर्गत अमरावतीत नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारा अभिनव उपक्रम Read More »

मजबूत लोकशाहीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार; अमरावती मनपात मतदार जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांची समन्वय बैठक

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मतदार जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक बुधवार, 7 जानेवारी 2026 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाली. या बैठकीत मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी मार्गदर्शन करत सामाजिक संस्थांची भूमिका लोकशाही प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

मजबूत लोकशाहीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार; अमरावती मनपात मतदार जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांची समन्वय बैठक Read More »

QR कोडद्वारे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधणे झाले अधिक सुलभ

अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत नागरिकांना मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती सहज आणि जलद मिळावी यासाठी अभिनव QR कोड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या QR कोडचे उद्घाटन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून काही क्षणांतच मतदार

QR कोडद्वारे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधणे झाले अधिक सुलभ Read More »

ई.व्ही.एम. प्रशिक्षण : आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांद्वारे पारदर्शक निवडणूक प्रक्रियेवर भर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने क्षेत्रीय अधिकारी (ZO) यांच्यासाठी ई.व्ही.एम. (Electronic Voting Machine) विषयक सविस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले. प्रशिक्षणादरम्यान ई.व्ही.एम. मशीनची रचना, कार्यपद्धती, मतदानपूर्व तयारी,

ई.व्ही.एम. प्रशिक्षण : आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या महत्त्वपूर्ण सूचनांद्वारे पारदर्शक निवडणूक प्रक्रियेवर भर Read More »

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील मतगणना केंद्राची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी, प्रशासन पूर्णतः सज्ज

आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ची मतगणना प्रक्रिया पारदर्शक, नियमबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा पुनरुच्चार करत निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतगणना केंद्राची सातही झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमवेत सखोल पाहणी केली. पाहणीदरम्यान मतगणना केंद्रावरील भौतिक व्यवस्था, मतमोजणी टेबल्सची मांडणी,

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील मतगणना केंद्राची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी, प्रशासन पूर्णतः सज्ज Read More »

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी, सुरक्षित व पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज

आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी आज शहरातील महत्त्वाच्या मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी करण्यात आली. अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तयारीचा आढावा घेतला. जमील कॉलनी परिसरातील शाळा क्र. 8 (मतदान केंद्र क्र. 19), ॲकॅडमी

महानगरपालिका निवडणूक 2025-26 : मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी, सुरक्षित व पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज Read More »

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील ई.व्ही.एम. गोदामाची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी

निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सांस्कृतिक भवन परिसरातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) गोदामाची सखोल पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई.व्ही.एम. यंत्रांची साठवणूक, सुरक्षा व व्यवस्थापनाची पडताळणी करण्यासाठी ही पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी ई.व्ही.एम. साठवणूक केंद्रातील कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया, देखभाल व तांत्रिक तपासणीचा आढावा घेतला. गोदामातील सीसीटीव्ही व्यवस्था, प्रवेश

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील ई.व्ही.एम. गोदामाची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी Read More »

Scroll to Top