अमरावतीतील अतिगर्दीच्या इमारतींच्या अग्निसुरक्षेवर महत्त्वपूर्ण बैठक; १५ दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश
शहरातील अतिगर्दीच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये आणि नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आज बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील विविध प्रकारच्या सार्वजनिक इमारतींमधील अग्निशमन सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान शहरातील […]









