Amravati Municipal Corporation

अमरावती महानगरपालिकेच्या शाळांचा पहिला दिवस उत्साहात; आयुक्तांसह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी, विद्यार्थ्यांना दिला शिक्षणाचा प्रेरणादायी संदेश

अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार दि. ३० जून २०२६ रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूलभूत सुविधा, अध्यापनाची तयारी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी शहरातील विविध महानगरपालिका शाळांना नियोजनबद्ध भेटी […]

अमरावती महानगरपालिकेच्या शाळांचा पहिला दिवस उत्साहात; आयुक्तांसह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी, विद्यार्थ्यांना दिला शिक्षणाचा प्रेरणादायी संदेश Read More »

प्लास्टिक बंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावतीत व्यापारी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची जनजागृती कार्यशाळा

स्वच्छ, हरित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक अमरावती शहर घडविण्याच्या उद्देशाने तसेच महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा, २००६ आणि राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या अविघटनशील वस्तूंवरील वापरबंदीबाबत जारी केलेल्या अधिसूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ३० जून) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहरातील व्यापारी, हॉटेल,

प्लास्टिक बंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावतीत व्यापारी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची जनजागृती कार्यशाळा Read More »

अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीकडून मा. महापौरांना निवेदन

अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीच्या वतीने अमरावती महानगरपालिकेकडून कोचिंग क्लासेसना देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा (फायर सेफ्टी) नोटिसीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी मा. महापौर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत शासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्यास समिती सकारात्मक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, शहरातील

अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीकडून मा. महापौरांना निवेदन Read More »

अमरावती महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत आढावा बैठक; नियमबाह्य कामकाजावर कारवाईचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज, सोमवार (दि. २९ जून २०२६) महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले वेळेत, अचूक आणि नियमानुसार उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच चुकीच्या पद्धतीने दाखले देणे किंवा नियमबाह्य कामकाज आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही

अमरावती महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत आढावा बैठक; नियमबाह्य कामकाजावर कारवाईचे निर्देश Read More »

शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला मनपा शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी भव्य कार्यप्रेरणा शिबिर

आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाला चालना देणे आणि शिक्षकांना नव्या शैक्षणिक बदलांसाठी प्रेरित करणे या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने एकदिवसीय भव्य कार्यप्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिक्षण सभापती अॅड. प्रीतीताई हर्षल रेवणे यांच्या कल्पकता, दूरदृष्टी आणि पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला महानगरपालिका संचालित ६३ शाळांतील मुख्याध्यापक

शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला मनपा शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी भव्य कार्यप्रेरणा शिबिर Read More »

फायर ऑडिटबाबत अमरावती महानगरपालिकेची कोचिंग क्लासेस संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सर्व कोचिंग क्लासेसमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी आज दि. २९ जून २०२६ महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे शहरातील विविध कोचिंग क्लासेसच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. बैठकीत अग्निसुरक्षा नियमांचे पालन, फायर ऑडिटची आवश्यकता, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या विविध

फायर ऑडिटबाबत अमरावती महानगरपालिकेची कोचिंग क्लासेस संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक Read More »

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद

भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिन (National Immunization Day – NID) अंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रे, पोलिओ लसीकरण बूथ, बसस्थानके, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विशेष भ्रमणशील पथकांच्या माध्यमातून ० ते

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी; २८ जून रोजी ६७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोहिमेच्या नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला असून शहरातील एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम

अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी; २८ जून रोजी ६७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब Read More »

बडनेरा झोनमध्ये प्लास्टिक जप्ती विशेष मोहीम; 20 आस्थापनांची तपासणी, ₹10 हजारांचा दंड

महानगरपालिकेच्या झोन क्र.4 (बडनेरा) अंतर्गत सूतगिरणी चौक ते गोपाल नगर मुख्य मार्ग परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. मा.आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे झोन क्र.4 यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण

बडनेरा झोनमध्ये प्लास्टिक जप्ती विशेष मोहीम; 20 आस्थापनांची तपासणी, ₹10 हजारांचा दंड Read More »

मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी

शुक्रवार दिनांक २६ जुन,२०२६ रोजी राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्‍ये संपन्‍न झाला. राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते राजर्षि शाहु महाराज यांच्‍या प्रति‍मेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती

मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी Read More »

Scroll to Top