मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची शाळा भेट – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी इमारत, डेस्क-बेंच व सायन्स लॅबची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश
अमरावती, दि. २९ ऑगस्ट २०२५ : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागपुरी गेट येथील मनपा प्राथमिक हिंदी शाळा क्र.१२ तसेच मनपा उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र.०७, मुजफ्फरपुरा या शाळांना भेट देऊन शाळांच्या स्थितीची पाहणी केली. शाळांची पाहणी व सूचना या भेटीत आयुक्तांनी शाळा परिसरातील स्वच्छता, सुरू असलेले स्वच्छतागृह बांधकाम, वर्गखोल्यांतील शैक्षणिक […]
