गाडगेनगर, नवसारी कचरा स्पॉट व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; समन्वयातून नियोजनबद्ध कामाचे निर्देश
अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी गाडगेनगर परिसर, नवसारी येथील कचरा संकलन स्थळ (कचरा स्पॉट) आणि नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाहणीची सुरुवात गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला […]









