हॉटेल व दवाखान्यांना कचरा व्यवस्थापनाचे सक्त आदेश; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा – आयुक्त सौम्या शर्मा चांडक
अमरावती शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग व्यवसाय तसेच हॉस्पिटल, नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध व नियमबद्ध विल्हेवाट लावणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिले आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६, बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापन नियम व स्वच्छ भारत अभियान (SBM) 2.0 अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर […]









