आयुक्तांनी घेतला मान्सुनपुर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे
हवामान खात्याने राज्यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या काळात सर्व संबंधीत मनपा यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी सांगितले. अमरावती महानगरपालिकेने नैसर्गिक आपत्ती उपाय योजना आराखडा तयार केला असुन अमरावती […]









