अमरावती मनपाची प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात धडक कारवाई; १२७० किलो प्लॅस्टिक जप्त; नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कार्यवाही
आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात जोरदार आणि सातत्यपूर्ण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता कडवी बाजार परिसरातील श्री. कृष्ण मिनी ट्रान्सपोर्ट येथे अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत १२७० किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्य जप्त […]









