जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश
आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कामाला गती देत झोननिहाय आढावा बैठक आयोजित केली. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी आणि जनगणना कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जनगणना संचालनालयाने नुकत्याच घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात […]









