नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने काम करावे – आयुक्त वर्षा लड्डा
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध विभागांनी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बैठकीत […]









