पश्चिम झोनमधील साफसफाई व्यवस्थेचा घेतला आढावा; अधिकारी व कंत्राटदारांची उपस्थिती स्वच्छता, नाला सफाईच्या प्रश्नांवर मनपा प्रशासनाचा आढावा
अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासोबतच नाल्यांची नियमित साफसफाईच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी गुरुवारी, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी महानगरपालिकेच्या पश्चिम झोनमधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिसरातील स्वच्छता, नाले तसेच उद्यान आणि सार्वजनिक जागांबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. आयुक्त डॉ. मंगेश









