Health

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मंजुरी प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांची जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

अमरावती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागामध्ये जन्म अथवा मृत्यूची घटना घडून १ महिना ते १ वर्ष कालावधी झालेल्या प्रकरणांसह सन २०१६ पूर्वीच्या Add Old Event प्रकरणांची नोंद दैनंदिन स्वरूपात ऑनलाइन पोर्टलद्वारे जिल्हा निबंधक जन्म-मृत्यू तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येते. या प्रकरणांना संबंधित कार्यालयाकडून मंजुरी (Approval) प्राप्त झाल्यानंतरच संबंधित नागरिकांना […]

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मंजुरी प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांची जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी Read More »

अमरावती महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत आढावा बैठक; नियमबाह्य कामकाजावर कारवाईचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज, सोमवार (दि. २९ जून २०२६) महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले वेळेत, अचूक आणि नियमानुसार उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच चुकीच्या पद्धतीने दाखले देणे किंवा नियमबाह्य कामकाज आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही

अमरावती महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यांबाबत आढावा बैठक; नियमबाह्य कामकाजावर कारवाईचे निर्देश Read More »

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद

भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लसीकरण दिन (National Immunization Day – NID) अंतर्गत रविवारी (दि. २८ जून) अमरावती महानगरपालिका क्षेत्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली. शहरातील सर्व शहरी आरोग्य केंद्रे, पोलिओ लसीकरण बूथ, बसस्थानके, रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विशेष भ्रमणशील पथकांच्या माध्यमातून ० ते

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला अमरावतीत उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी; २८ जून रोजी ६७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मोहिमेच्या नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला असून शहरातील एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम

अमरावतीत पल्स पोलिओ मोहिमेची तयारी; २८ जून रोजी ६७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब Read More »

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावतीत सामूहिक योगाभ्यास; विविध संस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावती महानगरपालिका आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियम येथे भव्य सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांमध्ये

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त अमरावतीत सामूहिक योगाभ्यास; विविध संस्थांच्या सहभागातून कार्यक्रम उत्साहात संपन्न Read More »

आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी

अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील आरोग्य व शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी शहरातील विविध दवाखाने व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज, सुविधा, स्वच्छता व्यवस्था तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

आरोग्य व शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणासाठी आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी Read More »

“डेंगूला हरविण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात” — महापौर श्रीचंद तेजवानी यांचे आवाहन

जागतिक डेंगू दिनानिमित्त आज दि. 16 मे 2026 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मनपा येथे उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीरोग तसेच विविध कीटकजन्य रोगांविषयी जनजागृती करून नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय

“डेंगूला हरविण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात” — महापौर श्रीचंद तेजवानी यांचे आवाहन Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांची शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सखोल भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर विशेष भर

नागरिकांना दर्जेदार, सुलभ व वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी रुक्मिणी नगर येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सविस्तर भेट देत केंद्रातील आरोग्यविषयक कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान आयुक्त महोदयांनी केंद्रामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांची माहिती घेतली. लसीकरण सत्रांचे नियोजन, अंमलबजावणी व उपलब्धता

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांची शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रास सखोल भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर विशेष भर Read More »

Emergency Services Workshop आयोजित: अमरावतीतील १३ UPHC व मनपा दवाखान्यांच्या आरोग्य सेवेला बळ

ही कार्यशाळा नागरी आरोग्य व्यवस्थेत सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा आणि जनआरोग्य सुधारणा यांना चालना देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. कार्यक्रमास राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहकार्य लाभले असून, आधार फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. कार्यशाळेत CPR Assessment, Basic & Advanced Life Support (BLS/ALS) तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे Structured Emergency Assessment याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. UPHC

Emergency Services Workshop आयोजित: अमरावतीतील १३ UPHC व मनपा दवाखान्यांच्या आरोग्य सेवेला बळ Read More »

अमरावतीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान अंतर्गत आयोजित आरोग्य शिबिराने शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकतेचा उत्साह वाढवला. दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चाललेल्या या शिबिरात १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, ज्यामध्ये महिला – ९,४६३ आणि पुरुष – ३,५२९ यांचा समावेश आहे. शिबिरात विविध तपासण्या करण्यात

अमरावतीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत १२,९९२ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला Read More »

Scroll to Top