दिव्यांग आनंद महोत्सवातून समतेचा संदेश — समाजाने समान संधी देणे हीच खरी जबाबदारी : आयुक्त सौम्या शर्मा चांडक
अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समता सप्ताह निमित्त आयोजित “दिव्यांग आनंद महोत्सव” अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडला. महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १३, चपराशीपुरा येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, तर महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, डॉ. […]



