अमरावती मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारताच महापौर श्रीचंद तेजवानी यांची घेतली सदिच्छा भेट
अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज, सोमवार दि. १३ जुलै,२०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांची सदिच्छा भेट घेतली. महापौरांच्या दालनात झालेल्या या भेटीत शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक व दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला. […]









