Amravati Municipal Corporation

अनधिकृत भंगार दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई; चार ट्रक भंगार साहित्य जप्त

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. या मोहिमेदरम्यान घुमंतुकांकडून भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अन्सार अहमद व संदीप सोनोने यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. […]

अनधिकृत भंगार दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई; चार ट्रक भंगार साहित्य जप्त Read More »

जनगणना २०२७ : पहिल्या टप्प्यात मध्य झोन राजापेठ व पूर्व झोन दस्तूरनगर अव्वल मुदतीपूर्वीच १०० टक्के घरयादी व गटयादीचे काम पूर्ण; आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घरयादी (एचएलबी) आणि गटयादी तयार करण्याच्या कामात मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ आणि पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. दोन्ही कार्यालयांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीपूर्वीच आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के काम पूर्ण करून शहरातील इतर चार्ज कार्यालयांसमोर आदर्श निर्माण केला

जनगणना २०२७ : पहिल्या टप्प्यात मध्य झोन राजापेठ व पूर्व झोन दस्तूरनगर अव्वल मुदतीपूर्वीच १०० टक्के घरयादी व गटयादीचे काम पूर्ण; आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव Read More »

रुक्मिणी नगरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹८ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे झोन क्र. ३ यांच्या मार्गदर्शनाखाली रुक्मिणी नगर परिसरात आज प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत काही ठिकाणी कापडी व

रुक्मिणी नगरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹८ हजारांचा दंड वसूल Read More »

आयुक्‍तांनी घेतला मान्‍सुनपुर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्‍ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे

हवामान खात्‍याने राज्‍यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्‍यापेक्षा जास्‍त पाऊस पडण्‍याच्‍या अंदाज वर्तवला आहे. पावसाच्‍या कालावधीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या दृष्‍टीने मनपाच्‍या सर्व यंत्रणांनी सज्‍ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्‍तीच्‍या काळात सर्व संबंधीत मनपा यंत्रणांनी समन्‍वयाने काम करावे असे मनपा आयुक्‍त वर्षा लड्डा यांनी सांगितले. अमरावती महानगरपालिकेने नैसर्गिक आपत्‍ती उपाय योजना आराखडा तयार केला असुन अमरावती

आयुक्‍तांनी घेतला मान्‍सुनपुर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्‍ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे Read More »

वादळी पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली; महानगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

अमरावती शहरात आज झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेची यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली असून नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक कॉलला प्रतिसाद देत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. शहरातील पाचही झोनमध्ये झाडे पडण्याच्या घटनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. अनेक ठिकाणी रस्ते अडथळाग्रस्त झाले

वादळी पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली; महानगरपालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत Read More »

शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू

विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि अभ्यासक्रमाच्या अध्यापनास वेळेत सुरुवात व्हावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या उपक्रमामुळे महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल ५० हजार १९१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार

शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू Read More »

२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्‍ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेला अधिक गती देण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून आज मध्य झोन क्र. २ अंतर्गत राजापेठ परिसरात मोठी वसुली कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराची तब्बल २२ लाख २१ हजार १२६ रुपये इतकी थकबाकी असलेल्या मालमत्तेला महानगरपालिकेच्या पथकाने सील केले.

२२.२१ लाखांच्या मालमत्ता कर थकबाकीपोटी मालमत्‍ता सील अमरावती महानगरपालिकेची धडक कारवाई; थकबाकीदारांवर कठोर भूमिका Read More »

हरित अमरावतीच्या दिशेने महानगरपालिकेचे पाऊल; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाची शपथ

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिका अंतर्गत माझी वसुंधरा अभियान तसेच राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत आज शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मनपा दवाखाना आसिर कॉलनी, तारखेडा, नमक कारखाना मागे वलगाव रोड येथे असलेल्या महानगरपालिका जागेवर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व

हरित अमरावतीच्या दिशेने महानगरपालिकेचे पाऊल; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणाची शपथ Read More »

आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सकाळी वडाळी येथील शहरी आरोग्य केंद्र, महानगरपालिका शाळा तसेच टी.बी. हॉस्पिटल मागील शहरी आरोग्य केंद्र व शाळेची पाहणी करून आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणीदरम्यान आयुक्तांनी आरोग्य केंद्रांमधील रुग्णसेवा, औषध

आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिकेची थकबाकीदारांवर कारवाई; दोन मालमत्ता सील

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांवर सुरू असलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत गुरुवारी मध्य झोन क्र. २, राजापेठ विभागात मोठी कारवाई करण्यात आली. मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या दोन थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या. महानगरपालिकेने यापुढेही अशीच कठोर भूमिका कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. महानगरपालिकेकडून प्राप्त

अमरावती महानगरपालिकेची थकबाकीदारांवर कारवाई; दोन मालमत्ता सील Read More »

Scroll to Top