Amravati Municipal Corporation

इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत हारार्पण कार्यक्रम संपन्न

अमरावती महानगरपालिकेत माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि भारताचे लोहमनुष्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हारार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडला. हारार्पण कार्यक्रमानंतर राष्ट्रीय एकता […]

इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत हारार्पण कार्यक्रम संपन्न Read More »

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त

अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला गती देण्यात आली आहे. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १६ आणि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सक्करसाथ आणि सराफा परिसरात मोठ्या प्रमाणावर जप्ती मोहीम राबविण्यात आली. मनपाच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी पथकाने सायंकाळपासून उशिरापर्यंत चालविलेल्या या

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त Read More »

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट — फुल विक्रेत्यांच्या नियोजनासह स्वच्छतेसाठी निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज (२८ ऑक्टोबर २०२५) जुना कॉटन मार्केट परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील फुल विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या विक्रीच्या ठिकाणांची पाहणी केली आणि त्यांच्यासाठी नियोजित जागा निश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला निर्देश दिले की, कॉटन मार्केट परिसरातील फुलवाल्यांच्या विक्रीसाठी योग्य व

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट — फुल विक्रेत्यांच्या नियोजनासह स्वच्छतेसाठी निर्देश Read More »

अमरावतीत “हॅप्पी स्ट्रीट (Raahgiri)” उपक्रमाची तयारी — नागरिकांसाठी आनंद, आरोग्य आणि सकस जीवनशैलीचा नवा उपक्रम

शहरातील नागरिकांना सकस, आरोग्यदायी आणि आनंददायी वातावरण मिळावे, यासाठी अमरावती महानगरपालिका “हॅप्पी स्ट्रीट प्रोग्राम (Raahgiri)” हा अभिनव उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्राथमिक बैठक घेण्यात आली. बैठकीस आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक अध्यक्षस्थानी होत्या. बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी, विभागीय समन्वय, नागरिकांचा सहभाग, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा

अमरावतीत “हॅप्पी स्ट्रीट (Raahgiri)” उपक्रमाची तयारी — नागरिकांसाठी आनंद, आरोग्य आणि सकस जीवनशैलीचा नवा उपक्रम Read More »

“माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमरावती महापालिका व WECS यांच्यात सामंजस्य करार — ‘सिटी बर्ड’ निवड, पक्षीप्रेमी संमेलन व नागरिकांमधील पर्यावरण जनजागृतीसाठी सहकार्य”

अमरावती महानगरपालिका (AMC) आणि वाइल्डलाईफ अँड एन्व्हायरन्मेंट कंझर्व्हेशन सोसायटी (WECS) यांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत अमरावती शहरात पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन उपक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार (MoU) केला. हा करार महापालिका कार्यालयात आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक (IAS) आणि WECS सचिव डॉ. जयंत वडतकर यांच्या हस्ते स्वाक्षरीत झाला. या कराराचा उद्देश

“माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमरावती महापालिका व WECS यांच्यात सामंजस्य करार — ‘सिटी बर्ड’ निवड, पक्षीप्रेमी संमेलन व नागरिकांमधील पर्यावरण जनजागृतीसाठी सहकार्य” Read More »

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक परिसरात पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जयस्तंभ चौक व वसंत टॉकीज परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्थिती आणि परिसरातील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. आयुक्तांनी सफाई कामगारांची तत्काळ नेमणूक करून नाल्यांची पूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश दिले तसेच

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक परिसरात पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश Read More »

आ. संजय खोडके व आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महापालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा — शहर विकासासाठी गतीमान कार्यवाहीचे निर्देश

दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आमदार संजय खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शहरातील नागरी सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी झालेल्या या बैठकीत महापालिका प्रशासनाला प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. ही बैठक मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. आयुक्त सौम्या शर्मा

आ. संजय खोडके व आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महापालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा — शहर विकासासाठी गतीमान कार्यवाहीचे निर्देश Read More »

कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई — ७ हजार किलो बंदी घातलेला प्लॅस्टिक साठा जप्त, पाच गोदामे सील

“प्लॅस्टिकमुक्त अमरावती” अभियानाला गती देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने कडवी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मनपाच्या संयुक्त पथकाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा चार ट्रक इतका साठा जप्त करून पाच गोदामे सील केली. सुमारे ७ हजार किलो, अंदाजे ₹६५ हजार किंमतीचा प्लॅस्टिक साठा जप्त करण्यात आला. ही मोहीम आयुक्त सौ.

कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई — ७ हजार किलो बंदी घातलेला प्लॅस्टिक साठा जप्त, पाच गोदामे सील Read More »

महापालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

दि. ७ ऑक्टोबर रोजी अमरावती महानगरपालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती शिल्पा नाईक यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक

महापालिकेत महर्षि वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी Read More »

दस्तूरनगर झोन क्र.३ मध्ये अनधिकृत पोस्टर-बॅनर आणि अतिक्रमणांवर कडक कारवाई

अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ (दस्तूरनगर) अंतर्गत शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आज कडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत अनधिकृत पोस्टर आणि बॅनर तसेच रस्त्यांवर असलेले अतिक्रमण लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली. शहरातील विविध इलेक्ट्रिक खांबांवर आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत पोस्टर व बॅनर हटवून एकूण १०८ बॅनर जप्त

दस्तूरनगर झोन क्र.३ मध्ये अनधिकृत पोस्टर-बॅनर आणि अतिक्रमणांवर कडक कारवाई Read More »

Scroll to Top