Amravati Municipal Corporation

पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार यांची भेट

यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार तसेच योगेश पीठे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी यांनी आज पाचही झोनला भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान जनगणना कक्ष व विविध गटांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी थेट संवाद साधून माहिती संकलन प्रक्रियेची सद्यस्थिती, कामातील प्रगती, तसेच येणाऱ्या […]

पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार यांची भेट Read More »

जणगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला

जणगणनेचे काम केवळ माहिती संकलनापुरते मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीचे भान जपणारे कार्य असल्याचे प्रत्यंतर अमरावती शहरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आले. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जणगणनेचे काम सुरू असताना प्रगणकांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याची घटना घडली असून या कार्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांचा अमरावती महानगरपालिकेकडून गौरव करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जणगणनेचे काम

जणगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला Read More »

स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळा उत्साहात संपन्न

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी शहीद स्मारक कस्तुरबा उद्यान, नेहरू मैदान येथे पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेत सीड बॉलची संकल्पना, त्याची निर्मिती प्रक्रिया व पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग

स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळा उत्साहात संपन्न Read More »

महानगरपालिकेमध्‍ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली

गुरुवार दिनांक २१ मे,२०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेमध्‍ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसा निमित्‍य दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्‍यात आली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्‍या हस्‍ते राजीव गांधी यांच्‍या प्रतिमेस हारार्पण करुन विनम्र अभिवादन विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा,

महानगरपालिकेमध्‍ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली Read More »

राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांची मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी घेतली सदिच्छा भेट

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मा. श्री. अरुण डोंगरे यांची अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी राज्य सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा निर्धारित

राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांची मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी घेतली सदिच्छा भेट Read More »

बकरी ईदनिमित्त अमरावती महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण तसेच गौवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात अमरावती महानगरपालिकेत गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक,

बकरी ईदनिमित्त अमरावती महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न Read More »

इतवारा बाजारात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम | २२ आस्थापनांची तपासणी; १२ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅम्प अंतर्गत इतवारा बाजार परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मोहिमेत २२ आस्थापनांची तपासणी करण्यात

इतवारा बाजारात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम | २२ आस्थापनांची तपासणी; १२ हजारांचा दंड वसूल Read More »

प्रभात चौकातून निराधार वृद्धाचे आधार केंद्रात पुनर्वसन

“एक हात मदतीचा” या अभिनव उपक्रमांतर्गत प्रभात टॉकीज परिसरातून एका निराधार वृद्ध नागरिकाला सुरक्षितपणे आधार केंद्रात दाखल करून मानवतेचे दर्शन घडविण्यात आले. आज दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास, शहरातील तापमान तब्बल 46° सेल्सिअस असताना प्रभात टॉकीजजवळ एक वृद्ध व्यक्ती गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून असल्याची माहिती स्थानिक व्यावसायिकाने आधार केंद्राला दूरध्वनीद्वारे दिली. संबंधित व्यक्तीची प्रकृती चिंताजनक

प्रभात चौकातून निराधार वृद्धाचे आधार केंद्रात पुनर्वसन Read More »

मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी वडाळी उद्यान परिसरात भव्य वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळालाही भेट देत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. पाहणीदरम्यान संजय राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक व

मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी वडाळी उद्यान परिसरात भव्य वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक Read More »

“डेंगूला हरविण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात” — महापौर श्रीचंद तेजवानी यांचे आवाहन

जागतिक डेंगू दिनानिमित्त आज दि. 16 मे 2026 रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मनपा येथे उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, हत्तीरोग तसेच विविध कीटकजन्य रोगांविषयी जनजागृती करून नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय

“डेंगूला हरविण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात” — महापौर श्रीचंद तेजवानी यांचे आवाहन Read More »

Scroll to Top