भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१०,५०० चा दंड
अमरावती महानगरपालिका झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये […]









