Amravati Municipal Corporation

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे संदर्भाधीन पत्रानुसार अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम आज दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महानगरपालिका, अमरावती येथे पार पडला. सदर सोडत कार्यक्रमात जेवड येथील महानगरपालिका व माध्‍यमिक शाळेतील विद्यार्थी […]

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न Read More »

अमरावती महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई — पहिल्या टप्प्यात १२५ अनधिकृत दुकाने हटविली

दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अनधिकृत बांधकामे, टिनशेड दुकाने आणि खोके हटविण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे १२५ अनधिकृत दुकाने आणि टिनशेड पाडण्यात आली, तर उर्वरित अतिक्रमणांवर पुढील

अमरावती महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई — पहिल्या टप्प्यात १२५ अनधिकृत दुकाने हटविली Read More »

अमरावती महानगरपालिकेत ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्सव — सामूहिक गायनातून एकता आणि देशप्रेमाचा संदेश

‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेत विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाली. देशभक्तीच्या घोषणांनी सभागृह दुमदुमले आणि वातावरणात अभिमान, एकता आणि ऊर्जा पसरली. या प्रसंगी

अमरावती महानगरपालिकेत ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्सव — सामूहिक गायनातून एकता आणि देशप्रेमाचा संदेश Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता पाहणी – नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभागाचे आवाहन

शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सकाळी शहरातील विविध भागांची पाहणी केली आणि नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी वेलकम पॉईंट, रहाटगाव रोड, नागपूर रोड आणि विभागीय आयुक्त कार्यालय परिसर या भागांतील रस्ते,

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता पाहणी – नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभागाचे आवाहन Read More »

मनपात महर्षि सुदर्शन जयंती उत्साहात साजरी

महर्षि सुदर्शन जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत बुधवारी हारार्पण कार्यक्रम मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या हस्ते महर्षि सुदर्शन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अशोक पासरे यांनी महर्षि सुदर्शन यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त महेश

मनपात महर्षि सुदर्शन जयंती उत्साहात साजरी Read More »

अमरावती महानगरपालिकेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा २०२५ विजेत्यांची घोषणा

अमरावती महानगरपालिका आणि विधिमंत्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “फोटोग्राफी स्पर्धा २०२५” मधील पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री. शंतनु पाटील, द्वितीय क्रमांक श्री. भूषण अळसपुरे आणि तृतीय क्रमांक श्री. संदीप चौधरी यांना प्राप्त झाला आहे. तसेच प्रोत्साहनपर पारितोषिके श्री. सुशांत पांडे आणि श्री. मनीष मु-हेकर यांना प्रदान करण्यात आली

अमरावती महानगरपालिकेतर्फे फोटोग्राफी स्पर्धा २०२५ विजेत्यांची घोषणा Read More »

अमरावती शहराला मिळणार ‘सिटी बर्ड’! महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची घोषणा

अमरावती, दि. १ नोव्हेंबर २०२५: “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी अमरावती महानगरपालिकेकडून एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लवकरच अमरावती शहराचा ‘सिटी बर्ड’ निवडण्यात येणार असून, यासाठी महानगरपालिकेने वाइल्डलाईफ एन्व्हायर्नमेंट कन्झर्वेशन सोसायटी (WECS) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या उपक्रमाची घोषणा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक (IAS) यांनी

अमरावती शहराला मिळणार ‘सिटी बर्ड’! महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची घोषणा Read More »

“Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेतून ‘आनंदाची भिंत’ उपक्रम — आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे महानगरपालिकेला सुपूर्तीकऱण

अमरावती, दि. १ नोव्हेंबर २०२५ — पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि समाजहित या उद्देशाने “Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेवर आधारित ‘आनंदाची भिंत’ हा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे सुपूर्तीकऱण आज अमरावती महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान (SBM) RRR सेंटर, अंबिका नगर येथे पार पडले. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून आशादिप फाउंडेशनकडून

“Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेतून ‘आनंदाची भिंत’ उपक्रम — आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे महानगरपालिकेला सुपूर्तीकऱण Read More »

इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत हारार्पण कार्यक्रम संपन्न

अमरावती महानगरपालिकेत माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि भारताचे लोहमनुष्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हारार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडला. हारार्पण कार्यक्रमानंतर राष्ट्रीय एकता

इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत हारार्पण कार्यक्रम संपन्न Read More »

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त

अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला गती देण्यात आली आहे. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १६ आणि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सक्करसाथ आणि सराफा परिसरात मोठ्या प्रमाणावर जप्ती मोहीम राबविण्यात आली. मनपाच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी पथकाने सायंकाळपासून उशिरापर्यंत चालविलेल्या या

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त Read More »

Scroll to Top