Amravati Municipal Corporation

मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर श्रीचंद तेजवानी यांचा गौरव

मा.मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विदर्भ सिंधी विकास परिषदतर्फे आयोजित ‘कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी सिंधी समाजाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागणीला न्याय देत मालकी हक्काच्या पट्ट्यांच्या वितरण प्रक्रियेला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, मध्य प्रदेशमधील भोपाळ […]

मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर श्रीचंद तेजवानी यांचा गौरव Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट

मदर्स डेच्या निमित्ताने सामाजिक संवेदनशीलतेचा हृदयस्पर्शी अनुभव रविवारी आधार शहरी बेघर निवारा केंद्रात पाहायला मिळाला. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सहपरिवार केंद्राला सदिच्छा भेट देत निवारावासी बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधला. आयुक्त वर्षा लड्डा यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता, शिस्त तसेच निवारावासींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आधार केंद्राच्या

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट Read More »

झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडून पाहणी

अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांची आज शनिवार, दिनांक ०९ एप्रिल २०२६ रोजी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये फरशी स्टॉप, दस्तूर नगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळील नाला, कवर नगर परिसरातील नाले व रस्ते, व्ही.आय.पी. अपार्टमेंट शेजारील नाला, शंकर नगरचा नाला तसेच केडिया नगर उद्यान परिसराचा

झोन क्र. ०२ राजापेठ अंतर्गत विविध भागांची अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्याकडून पाहणी Read More »

पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” साठी शहरी संवाद कार्यक्रम संपन्न

“विकसित महाराष्ट्र 2047” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय शहरी संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या एकदिवसीय कार्यक्रमात राज्यभरातील महापौर, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि प्रकल्प प्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभेच्या खासदार मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते

पुण्यात “विकसित महाराष्ट्र 2047” साठी शहरी संवाद कार्यक्रम संपन्न Read More »

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता-१, प्रकाश विभाग, प्रधानमंत्री आवास योजना विभाग, आरोग्‍य विभाग, स्‍वच्‍छता विभाग, उद्यान विभाग, पशु विभाग, विधी विभाग, अभिलेखागार विभाग, लेखा विभाग, अतिरिक्‍त आयुक्‍त कार्यालय, उपायुक्‍त कार्यालय, कॅश विभाग, जन्‍म-मृत्‍यु विभाग, संगणक विभाग, जनसंपर्क विभाग, सामान्‍य

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी Read More »

११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त; व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंड

अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक प्लास्टिकविरोधात आज मोठी कारवाई करत तब्बल ११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले. “स्वच्छ शहर – प्लास्टिकमुक्त शहर” या उद्दिष्टाने महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवत संबंधित व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंडही वसूल केला. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त

११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त; व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंड Read More »

अमरावतीत जनगणना २०२७ साठी प्रशिक्षणाला गती; झोन सभापती स्वाती कुलकर्णी यांची भेट

आगामी २०२७ च्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या गणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज प्रशिक्षणाचे तिसरे सत्र उत्साहात पार पडले. २३ एप्रिल ते ०८ मे २०२६ या कालावधीत शहरातील पाचही झोनमध्ये एकाचवेळी सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत विविध तांत्रिक व प्रात्यक्षिक सत्रांद्वारे गणक व पर्यवेक्षकांना सक्षम केले जात आहे. घरगुती

अमरावतीत जनगणना २०२७ साठी प्रशिक्षणाला गती; झोन सभापती स्वाती कुलकर्णी यांची भेट Read More »

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीची एमपीएससी द्वारे निवड

अमरावती महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्र. १४ वडाळी येथील विद्यार्थिनी कु. ऋतिका प्रदीप गायकवाड हिने सतत मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा पास केली आहे. परीक्षा पास करून तिची निवड मंत्रालया मध्ये झालेली आहे. ऋतिका गायकवाड हिने महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १४ येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. वडाळी शाळेचे

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीची एमपीएससी द्वारे निवड Read More »

अमरावतीत जनगणना मोहिमेला सुरुवात; मान्यवरांकडून ‘स्व-गणना’ करून नागरिकांना आवाहन

दि. १ मे — अमरावती शहरात आजपासून जनगणना मोहिमेला प्रारंभ झाला असून, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार

अमरावतीत जनगणना मोहिमेला सुरुवात; मान्यवरांकडून ‘स्व-गणना’ करून नागरिकांना आवाहन Read More »

अमरावती महानगरपालिकेत महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवस साजरा

अमरावती महानगरपालिकेत महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवसानिमित्‍त महानगरपालिकेचे मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करुन साजरा करण्‍यात आला. शुक्रवार दिनांक १ मे,२०२६ रोजी अमरावती मनपाच्‍या प्रांगणात सदर ध्‍वजारोहन कार्यक्रम सकाळी ठिक ७.१५ मिनिटांनी घेण्‍यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवसाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित

अमरावती महानगरपालिकेत महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवस साजरा Read More »

Scroll to Top