Sanitation

फ्रेजरपुरा कचरा संकलन व्यवस्थेची आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला गती देण्यासाठी आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी फ्रेजरपुरा परिसरातील कचरा संकलन व्यवस्थेची पाहणी केली. आयुक्तांनी कचरा संकलन प्रक्रिया, वाहने, यंत्रसामग्री, संकलन केंद्रांची मांडणी आणि कर्मचारीवर्गाचे कामकाज यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. वेळापत्रकाचे पालन, कचराविल्हेवाट पद्धती आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचीही माहिती घेतली. वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या ताणाचा कचरा संकलनावर […]

फ्रेजरपुरा कचरा संकलन व्यवस्थेची आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी Read More »

नागरिकांच्या तक्रारींनंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पार्वती नगर क्रमांक ३ व म्हाडा परिसर मध्ये अचानक पाहणी; नाले व स्वच्छतेसाठी तातडीच्या आयुक्तांनी दिल्या सूचना

नागरिकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पार्वती नगर क्रमांक ३, म्हाडा परिसराला भेट देऊन तेथील नाले, ड्रेनेज व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छतेची सविस्तर पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून पार्वती नगर परिसरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा, पाण्याचा ठिकठिकाणी झालेला अडथळा तसेच स्वच्छतेच्या अभावाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी

नागरिकांच्या तक्रारींनंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पार्वती नगर क्रमांक ३ व म्हाडा परिसर मध्ये अचानक पाहणी; नाले व स्वच्छतेसाठी तातडीच्या आयुक्तांनी दिल्या सूचना Read More »

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी कंपोस्ट डेपो व शवदाहिनीची पाहणी — ‘स्वच्छ अमरावती’साठी कामे गतीमान करण्याचे निर्देश

दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच मृत जनावरांसाठी प्रस्तावित शवदाहिनी प्रकल्प स्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीमान करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी कंपोस्ट डेपोतील सेंद्रिय कचरा प्रक्रिया, वर्गीकरण यंत्रणा आणि स्वच्छता व्यवस्थेचा आढावा

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी कंपोस्ट डेपो व शवदाहिनीची पाहणी — ‘स्वच्छ अमरावती’साठी कामे गतीमान करण्याचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता पाहणी – नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभागाचे आवाहन

शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सकाळी शहरातील विविध भागांची पाहणी केली आणि नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी वेलकम पॉईंट, रहाटगाव रोड, नागपूर रोड आणि विभागीय आयुक्त कार्यालय परिसर या भागांतील रस्ते,

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता पाहणी – नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभागाचे आवाहन Read More »

“Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेतून ‘आनंदाची भिंत’ उपक्रम — आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे महानगरपालिकेला सुपूर्तीकऱण

अमरावती, दि. १ नोव्हेंबर २०२५ — पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि समाजहित या उद्देशाने “Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेवर आधारित ‘आनंदाची भिंत’ हा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे सुपूर्तीकऱण आज अमरावती महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान (SBM) RRR सेंटर, अंबिका नगर येथे पार पडले. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून आशादिप फाउंडेशनकडून

“Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेतून ‘आनंदाची भिंत’ उपक्रम — आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे महानगरपालिकेला सुपूर्तीकऱण Read More »

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त

अमरावती महानगरपालिकेतर्फे स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला गती देण्यात आली आहे. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली १६ आणि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सक्करसाथ आणि सराफा परिसरात मोठ्या प्रमाणावर जप्ती मोहीम राबविण्यात आली. मनपाच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणी पथकाने सायंकाळपासून उशिरापर्यंत चालविलेल्या या

सक्करसाथ-सराफा परिसरात मनपाची मोठी धडक कारवाई — दोन गोडाऊन सील, २१५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक आणि तीन ट्रक माल जप्त Read More »

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट — फुल विक्रेत्यांच्या नियोजनासह स्वच्छतेसाठी निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज (२८ ऑक्टोबर २०२५) जुना कॉटन मार्केट परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील फुल विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या विक्रीच्या ठिकाणांची पाहणी केली आणि त्यांच्यासाठी नियोजित जागा निश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. आयुक्तांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला निर्देश दिले की, कॉटन मार्केट परिसरातील फुलवाल्यांच्या विक्रीसाठी योग्य व

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची जुना कॉटन मार्केट परिसराला भेट — फुल विक्रेत्यांच्या नियोजनासह स्वच्छतेसाठी निर्देश Read More »

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक परिसरात पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जयस्तंभ चौक व वसंत टॉकीज परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या तक्रारींचा सखोल आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी नाल्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्थिती आणि परिसरातील स्वच्छतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. आयुक्तांनी सफाई कामगारांची तत्काळ नेमणूक करून नाल्यांची पूर्ण स्वच्छता करण्याचे आदेश दिले तसेच

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची जयस्तंभ चौक परिसरात पाहणी — नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश Read More »

कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई — ७ हजार किलो बंदी घातलेला प्लॅस्टिक साठा जप्त, पाच गोदामे सील

“प्लॅस्टिकमुक्त अमरावती” अभियानाला गती देण्यासाठी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने कडवी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मनपाच्या संयुक्त पथकाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिक साहित्याचा चार ट्रक इतका साठा जप्त करून पाच गोदामे सील केली. सुमारे ७ हजार किलो, अंदाजे ₹६५ हजार किंमतीचा प्लॅस्टिक साठा जप्त करण्यात आला. ही मोहीम आयुक्त सौ.

कडवी बाजारात मनपाची धडक कारवाई — ७ हजार किलो बंदी घातलेला प्लॅस्टिक साठा जप्त, पाच गोदामे सील Read More »

“राजापेठ झोनमध्ये प्लास्टिक जप्ती मोहिमेत ११ हजार रुपये दंड; नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन”

अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने राजापेठ झोन क्र. ०२, प्रभाग क्र. ०७ मधील जवाहर स्टेडियम परिसरात विशेष प्लास्टिक जप्ती मोहिमेचे आयोजन केले. या कारवाईदरम्यान २३५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजल ग्लास आणि चमचे जप्त करण्यात आले. प्लास्टिकचा साठा केल्याबद्दल आस्थापनाधारकावर १०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच परिसरातील दोन आस्थापनांकडे डस्टबिन नसल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात

“राजापेठ झोनमध्ये प्लास्टिक जप्ती मोहिमेत ११ हजार रुपये दंड; नागरिकांना स्वच्छतेसाठी आवाहन” Read More »

Scroll to Top