Commissioner

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी

अमरावती शहरातील न्यू गणेश कॉलनी परिसरात सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग बंद करून त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्या गंभीर तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. या

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी Read More »

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्याने, नागरिक सुविधा तसेच परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून करण्यात आली. आयुक्तांनी येथून पुढे पायदळ फेरफटका मारत संपूर्ण

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी Read More »

अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची विविध विभागांना भेट; प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यावर भर

अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज, सोमवार दि. १३ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी करून विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेतला. प्रशासनाची सद्यस्थिती, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, प्रलंबित कामे, विकासकामांची अंमलबजावणी तसेच कार्यालयीन कार्यपद्धतीची माहिती त्यांनी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. पाहणीदरम्यान आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले यांनी विविध विभागांच्या

अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची विविध विभागांना भेट; प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यावर भर Read More »

अमरावती मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारताच महापौर श्रीचंद तेजवानी यांची घेतली सदिच्छा भेट

अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज, सोमवार दि. १३ जुलै,२०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांची सदिच्छा भेट घेतली. महापौरांच्या दालनात झालेल्या या भेटीत शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक व दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

अमरावती मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारताच महापौर श्रीचंद तेजवानी यांची घेतली सदिच्छा भेट Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. मंगेश गोंदावले रुजू

अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले (भा.प्र.से.) यांनी आज पदभार स्वीकारला. माजी आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्याकडून त्यांनी अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारत शहराच्या सर्वांगीण, शाश्वत व नागरिकाभिमुख विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. गोंदावले यांनी सांगितले की, अमरावती शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कार्य केले जाईल. महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेले

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. मंगेश गोंदावले रुजू Read More »

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने काम करावे – आयुक्त वर्षा लड्डा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध विभागांनी केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बैठकीत

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेऊन समन्वयाने काम करावे – आयुक्त वर्षा लड्डा Read More »

वादळी पावसानंतर अमरावती महानगरपालिका प्रशासन सतर्क; आयुक्त वर्षा लड्डा यांची राजापेठ व बेलपुरा परिसरात प्रत्यक्ष पाहणी

रविवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची कामे हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १५ जून २०२६

वादळी पावसानंतर अमरावती महानगरपालिका प्रशासन सतर्क; आयुक्त वर्षा लड्डा यांची राजापेठ व बेलपुरा परिसरात प्रत्यक्ष पाहणी Read More »

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी नाल्यांची पाहणी; अमरावतीकरांना नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी नमुना गल्ली, अंबानाला, भुतेश्वर चौक, पन्नालाल नगर, समाधान नगर

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी नाल्यांची पाहणी; अमरावतीकरांना नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन Read More »

राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांची मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी घेतली सदिच्छा भेट

अमरावती विभागाच्या राज्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर मा. श्री. अरुण डोंगरे यांची अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी राज्य सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. भेटीदरम्यान नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा निर्धारित

राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांची मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी घेतली सदिच्छा भेट Read More »

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवार, दिनांक ७ मे २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता-१, प्रकाश विभाग, प्रधानमंत्री आवास योजना विभाग, आरोग्‍य विभाग, स्‍वच्‍छता विभाग, उद्यान विभाग, पशु विभाग, विधी विभाग, अभिलेखागार विभाग, लेखा विभाग, अतिरिक्‍त आयुक्‍त कार्यालय, उपायुक्‍त कार्यालय, कॅश विभाग, जन्‍म-मृत्‍यु विभाग, संगणक विभाग, जनसंपर्क विभाग, सामान्‍य

महानगरपालिकेच्या विविध विभागांची आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून कार्यालयीन कामकाजाची पाहणी Read More »

Scroll to Top