Amravati Municipal Corporation

निवडणूक तयारीला वेग : आयुक्तांची बडनेरा झोन कार्यालयास पाहणी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज (१८ डिसेंबर २०२५) सायंकाळी ७ वाजता बडनेरा झोन कार्यालयाची सविस्तर पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पडावी, यासाठी सुरू असलेल्या तयारीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी बडनेरा प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी मतदारांसाठी मूलभूत सुविधांवर भर […]

निवडणूक तयारीला वेग : आयुक्तांची बडनेरा झोन कार्यालयास पाहणी Read More »

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतगणना केंद्रांची पाहणी: पोलिस आयुक्त राकेश ओला व महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची संयुक्त पाहणी

आगामी मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी, या अनुषंगाने अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला व महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज, १७ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील प्रमुख मतगणना केंद्रांची पाहणी केली. या पाहणीमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सांस्कृतिक भवन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी (क्र. २) यांचे नवीन तहसील कार्यालय यांचा समावेश होता. दोन्ही आयुक्तांनी

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतगणना केंद्रांची पाहणी: पोलिस आयुक्त राकेश ओला व महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची संयुक्त पाहणी Read More »

निवडणूक नियोजनाच्या तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची विविध कार्यालयांना भेट

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज, मंगळवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी शहरातील निवडणूक नियोजनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. याअंतर्गत त्यांनी महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयांसह महत्त्वाच्या विभागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमध्ये मध्यम झोन क्र.२, पूर्व झोन क्र.३, पश्चिम झोन क्र.५, शिक्षण विभाग तसेच जुने तहसील कार्यालय

निवडणूक नियोजनाच्या तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची विविध कार्यालयांना भेट Read More »

निवडणूक नियोजनासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्तांची उत्तर झोन कार्यालयास सविस्तर पाहणी

दि. १६ डिसेंबर २०२५ : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ कार्यालयाची सखोल पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया सुचारू, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी

निवडणूक नियोजनासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्तांची उत्तर झोन कार्यालयास सविस्तर पाहणी Read More »

आयुक्तांची शहरातील साफसफाई व अतिक्रमणाबाबत पाहणी; साफसफाई व अतिक्रमणमुक्त शहरासाठी कडक निर्देश

शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी शहरातील प्रमुख भागांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान जयस्तंभ चौक ते जुना कॉटन मार्केट, चौधरी चौक, विलास नगर तसेच गाडगेनगर परिसराचा आयुक्तांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. पाहणीदरम्यान शहरातील साफसफाईची सद्यस्थिती, रस्त्यांची अवस्था, सार्वजनिक ठिकाणी

आयुक्तांची शहरातील साफसफाई व अतिक्रमणाबाबत पाहणी; साफसफाई व अतिक्रमणमुक्त शहरासाठी कडक निर्देश Read More »

नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे मतमोजणी स्थळाची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याकडून सविस्तर पाहणी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी स्थळाची सखोल पाहणी केली. या वेळी आयुक्तांनी मतमोजणीसाठी तयार करण्यात आलेल्या सर्व कक्षांची प्रत्यक्ष तपासणी करत टेबलांची मांडणी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी बसण्याची

नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे मतमोजणी स्थळाची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्याकडून सविस्तर पाहणी Read More »

महानगरपालिका निवडणूक तयारीचा सखोल आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

अमरावती महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन व अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आढावा

महानगरपालिका निवडणूक तयारीचा सखोल आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक Read More »

“साझा अलमारी – आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक”

अमरावती महानगरपालिकेच्या SBM RRR सेंटर, अंबिका नगर मनपा शाळा येथे 10 डिसेंबर 2025 रोजी संकल्प सेवा संस्थेद्वारे आयोजित “साझा अलमारी – आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक” या उपक्रमांतर्गत संकलित साहित्यमधील वस्तूंचे अधिकृत सुपूर्दकरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश Reduce–Reuse–Recycle संस्कृती बळकट करणे, वापरण्यायोग्य साहित्य गरजूंपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढवणे असा आहे.

“साझा अलमारी – आपकी अलमारी से उनकी मुस्कान तक” Read More »

Emergency Services Workshop आयोजित: अमरावतीतील १३ UPHC व मनपा दवाखान्यांच्या आरोग्य सेवेला बळ

ही कार्यशाळा नागरी आरोग्य व्यवस्थेत सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा आणि जनआरोग्य सुधारणा यांना चालना देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. कार्यक्रमास राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहकार्य लाभले असून, आधार फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. कार्यशाळेत CPR Assessment, Basic & Advanced Life Support (BLS/ALS) तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे Structured Emergency Assessment याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. UPHC

Emergency Services Workshop आयोजित: अमरावतीतील १३ UPHC व मनपा दवाखान्यांच्या आरोग्य सेवेला बळ Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता यंत्रणेची विस्तृत पाहणी

अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या अनुषंगाने आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी नवसारी परिसर, वाघमारे चौक आणि ट्रान्सपोर्ट नगर या भागातील कचरा संकलन आणि विल्हेवाट यंत्रणेची व्यापक पाहणी केली. शहरातील वाढत्या कचरा निर्मितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा उपायांची दिशा ठरवण्याचा हा

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता यंत्रणेची विस्तृत पाहणी Read More »

Scroll to Top