Amravati Municipal Corporation

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानापासून महानगरपालिका अमरावतीच्या प्रत्यक्ष घरगणनेचा शुभारंभ

अमरावती महानगरपालिकेच्या घरगणना अभियानाचा शुभारंभ आज दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळी ०८ वाजता मा. श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा अमरावती यांच्या निवासस्थानास घरगणना क्रमांक प्रदान करून प्रत्यक्ष घरगणना कार्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी मा. श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा अमरावती, मा. श्री योगेश पीठे, उपायुक्त (१), मनपा अमरावती, मा. श्री नंदकिशोर तिखीले, चार्ज अधिकारी […]

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानापासून महानगरपालिका अमरावतीच्या प्रत्यक्ष घरगणनेचा शुभारंभ Read More »

महानगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुलींचा उपमहापौरांकडून सत्कार

शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने मा. उपमहापौर श्री. सचिनभाऊ भेंडे यांच्या तर्फे सोमवारी उपमहापौर कक्षामध्ये वर्ग १० वीतील गुणवंत विद्यार्थिनींच्या वडिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री. चंद्रकांत बुंदेले यांच्या दोनही मुलींनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. कु. रिद्धी चंद्रकांत बुंदेले हिने ९२.२० टक्के गुण मिळवले असून

महानगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुलींचा उपमहापौरांकडून सत्कार Read More »

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी घेतला प्रभाग क्र. ७ मधील स्वच्छता कामांचा आढावा

अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी प्रभाग क्र. ७ जवाहर स्टेडियम परिसरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा व्यवस्थापन तसेच पावसाळ्यापूर्वी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस स्वास्थ निरीक्षक, सफाई कर्मचारी, बिटप्यून, कोणार्क कंपनीचे कंत्राटदार तसेच स्वच्छता विभागातील संबंधित अधिकारी

महापौर श्रीचंद तेजवानी यांनी घेतला प्रभाग क्र. ७ मधील स्वच्छता कामांचा आढावा Read More »

महानगरपालिका वडाळी शाळेचा भारत टॅलेंट सर्च परीक्षेत १००% निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अमरावती महानगरपालिका शाळा क्रमांक १४, वडाळी येथील विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्येही महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी सरस ठरत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मागील काही वर्षांपासून भौतिक सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ होत असून, त्याचा सकारात्मक

महानगरपालिका वडाळी शाळेचा भारत टॅलेंट सर्च परीक्षेत १००% निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश Read More »

महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त; आयुक्त वर्षा लड्डा यांचे कडक निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागपुरी गेट परिसर, ट्रान्सपोर्ट मार्केट परिसर, अग्निशमन केंद्र तसेच हबीब नगर येथील महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसची पाहणी करून अतिक्रमणाबाबत संबंधित विभागांना कडक निर्देश दिले. पाहणीदरम्यान हबीब नगर येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेसवर बांधण्यात आलेल्या वॉल कंपाऊंडच्या आत ११ जनावरे व ६ बोकड बांधून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित जनावरे

महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त; आयुक्त वर्षा लड्डा यांचे कडक निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका मध्‍य झोन क्र. २ राजापेठ येथे झोन सभापती सौ. स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

अमरावती महानगरपालिका अंतर्गत मध्‍य झोन क्र. २, राजापेठ येथे आज सौ. स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी यांनी झोन सभापती पदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्त आयोजित समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, झोन क्र.१ सभापती सौ. माधुरी ठाकरे, शहर सुधार समिती सभापती सौ. राधा कुरील, शिक्षण समिती सभापती

अमरावती महानगरपालिका मध्‍य झोन क्र. २ राजापेठ येथे झोन सभापती सौ. स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न Read More »

स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरणावर भर; RDF निर्मिती, बायोमायनिंग व वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा

शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे व अन्य मान्यवरांनी बुधवारी (दि. १३ मे) सुकळी येथील घनकचरा व्यवस्थापन (MSW) प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी शहरातून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची २५० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया क्षमता असून, ओला,

स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरणावर भर; RDF निर्मिती, बायोमायनिंग व वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा Read More »

मनपात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

गुरुवार दिनांक १४ मे,२०२६ रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, झोन सभापती

मनपात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी Read More »

माध्यमिक शालांत परीक्षेत सई मोकलकर हिचे घवघवीत यश

नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालात नवसारी प्रभागातील विलास कॉलनी येथे राहणारी व होली क्रॉस इंग्रजी कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी सई रीता सतीश मोकलकर हिने ९९.६० टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशानिमित्त अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते सईचा

माध्यमिक शालांत परीक्षेत सई मोकलकर हिचे घवघवीत यश Read More »

अमरावती महानगरपालिकेचा उपक्रम : “एक हात मदतीचा”

दि. 13 मे 2026 रोजी सकाळी घराबाहेर पडलेल्या तुळजाबाई गवई या चालत-चालत प्रशांत नगर परिसरात पोहोचल्या होत्या. सायंकाळी शुभम कॉलनीजवळ त्या जखमी अवस्थेत आढळून आल्याची माहिती नागरिकांनी आधार केंद्राला दिली. माहिती मिळताच आधार केंद्राच्या टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून विचारपूस केली. आजीबाई फक्त “संजय गांधी नगर” एवढीच माहिती देत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.

अमरावती महानगरपालिकेचा उपक्रम : “एक हात मदतीचा” Read More »

Scroll to Top