Amravati Municipal Corporation

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा — महानगरपालिकेची धडक मोहीम सुरू

दि. 14 नोव्हेंबर 2025 | अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेकडून धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. पादचारी मार्ग, रस्त्यांच्या कडेला तसेच सार्वजनिक जागांवर करण्यात आलेल्या लोखंडी शेड, काँक्रीट ओटे, टिनशेड, अवैध खोके आणि झोपड्यांवर आज मोठी कारवाई करण्यात आली. माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार आजच्या कारवाईत जेसीपी व चार ट्रकच्या सहाय्याने जमील […]

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा — महानगरपालिकेची धडक मोहीम सुरू Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या छायाचित्र स्पर्धा २०२५ अंतर्गत विजेत्यांचा गौरव

अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक २ सप्टेंबर २०२५ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा आज, १४ नोव्हेंबर २०२५, महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी भूषविले. स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे परीक्षण क्षेत्रातील

अमरावती महानगरपालिकेच्या छायाचित्र स्पर्धा २०२५ अंतर्गत विजेत्यांचा गौरव Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली कर वसुलीबाबत महत्त्वाची आढावा बैठक

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आज विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कर वसुली, प्रलंबित कर प्रकरणे आणि आगामी महसूल वाढीच्या नियोजनासंदर्भात एक महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कर विभागातील सर्व टॅक्स वसुली लिपिक उपस्थित होते. बैठकीत आयुक्तांनी कर वसुली प्रक्रियेचे सध्याचे चित्र, प्रलंबित कर प्रकरणांची स्थिती आणि वसुलीतील अडचणींचा

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली कर वसुलीबाबत महत्त्वाची आढावा बैठक Read More »

अमरावतीत रस्त्यांवरील खड्डे व मॅनहोल समस्यांवर तातडीची कारवाई; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र. ७१/२०१३ अंतर्गत १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार अमरावती महानगरपालिकेत रस्त्यांवरील खड्डे व खुले मॅनहोल समस्येसंदर्भात महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. आदेशातील मुद्दा क्र. ७०(३) नुसार ही बैठक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयुक्त तथा समिती अध्यक्ष सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी,

अमरावतीत रस्त्यांवरील खड्डे व मॅनहोल समस्यांवर तातडीची कारवाई; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक Read More »

मनपात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी

शुक्रवार दिनांक १४ नोव्‍हेंबर,२०२५ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्‍ये संपन्‍न झाला. पंडीत जवाहरलाल नेहरु यांची जयंती निमित्‍य महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांचे शुभहस्‍ते पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्‍या प्रति‍मेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्‍यात आले. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त

मनपात पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती साजरी Read More »

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी कंपोस्ट डेपो व शवदाहिनीची पाहणी — ‘स्वच्छ अमरावती’साठी कामे गतीमान करण्याचे निर्देश

दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच मृत जनावरांसाठी प्रस्तावित शवदाहिनी प्रकल्प स्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीमान करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी कंपोस्ट डेपोतील सेंद्रिय कचरा प्रक्रिया, वर्गीकरण यंत्रणा आणि स्वच्छता व्यवस्थेचा आढावा

आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सुकळी कंपोस्ट डेपो व शवदाहिनीची पाहणी — ‘स्वच्छ अमरावती’साठी कामे गतीमान करण्याचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे संदर्भाधीन पत्रानुसार अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम आज दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महानगरपालिका, अमरावती येथे पार पडला. सदर सोडत कार्यक्रमात जेवड येथील महानगरपालिका व माध्‍यमिक शाळेतील विद्यार्थी

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न Read More »

अमरावती महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई — पहिल्या टप्प्यात १२५ अनधिकृत दुकाने हटविली

दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अनधिकृत बांधकामे, टिनशेड दुकाने आणि खोके हटविण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे १२५ अनधिकृत दुकाने आणि टिनशेड पाडण्यात आली, तर उर्वरित अतिक्रमणांवर पुढील

अमरावती महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई — पहिल्या टप्प्यात १२५ अनधिकृत दुकाने हटविली Read More »

अमरावती महानगरपालिकेत ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्सव — सामूहिक गायनातून एकता आणि देशप्रेमाचा संदेश

‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेत विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाली. देशभक्तीच्या घोषणांनी सभागृह दुमदुमले आणि वातावरणात अभिमान, एकता आणि ऊर्जा पसरली. या प्रसंगी

अमरावती महानगरपालिकेत ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्सव — सामूहिक गायनातून एकता आणि देशप्रेमाचा संदेश Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता पाहणी – नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभागाचे आवाहन

शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सकाळी शहरातील विविध भागांची पाहणी केली आणि नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी वेलकम पॉईंट, रहाटगाव रोड, नागपूर रोड आणि विभागीय आयुक्त कार्यालय परिसर या भागांतील रस्ते,

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची स्वच्छता पाहणी – नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभागाचे आवाहन Read More »

Scroll to Top