Amravati Municipal Corporation

अमरावती महानगरपालिकेत वीर बाल दिवस

शुक्रवार, दि. 26 डिसेंबर 2025 रोजी अमरावती महानगरपालिकेत वीर बाल दिवस या निमित्ताने महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते साहिबजादे बाबा जोरावर सिंह जी व बाबा फतेह सिंह जी यांच्या प्रतिमेस हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमातून वीर बालकांच्या त्यागाची आठवण करून देत त्यांच्या आदर्शांपासून […]

अमरावती महानगरपालिकेत वीर बाल दिवस Read More »

सेंट कॅथेड्रल चर्च परिसरात ख्रिसमस साजरा; मतदार हक्काबाबत शपथ व जनजागृती | १५ जानेवारीला लोकशाहीचा उत्सव साजरा करा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत शहरात व्यापक मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इर्वीन चौक परिसरातील सेंट कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस दिनानिमित्त विशेष मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी उपस्थित नागरिकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मतदार हक्क बजावण्याची शपथ

सेंट कॅथेड्रल चर्च परिसरात ख्रिसमस साजरा; मतदार हक्काबाबत शपथ व जनजागृती | १५ जानेवारीला लोकशाहीचा उत्सव साजरा करा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक Read More »

अमरावती मनपात निवडणूक तयारीचा सखोल आढावा; अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांची विभागनिहाय पाहणी, महत्त्वपूर्ण सूचना

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आज गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी मनपातील विविध विभागांना भेट देत सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान माहिती कक्ष, निवडणूक विभाग, भांडार विभाग व नगरसचिव विभागातील निवडणूक विषयक कामकाजाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत निवडणूक तयारी,

अमरावती मनपात निवडणूक तयारीचा सखोल आढावा; अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांची विभागनिहाय पाहणी, महत्त्वपूर्ण सूचना Read More »

मनपात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी

गुरुवार दिनांक 25 डिसेंबर,2025 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्‍य अतिरिक्त आयुक्‍त शिल्पा नाईक यांचे हस्‍ते अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड,

मनपात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती साजरी Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावतीत कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक संपन्न

आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडणे, या उद्देशाने आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त राकेश ओला व

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावतीत कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक संपन्न Read More »

अमरावती मनपा निवडणूक २०२५ : संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक, कडक निगराणी यंत्रणा सज्ज

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष राहावी, या उद्देशाने आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी संनियंत्रण समितीची सविस्तर व महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ही बैठक निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राबविण्यात

अमरावती मनपा निवडणूक २०२५ : संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक, कडक निगराणी यंत्रणा सज्ज Read More »

पथनाट्यातून मतदानाचा संदेश : संत गाडगेबाबा यात्रेत SVEEP उपक्रमांतर्गत प्रभावी जनजागृती

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील गर्दीच्या ठिकाणी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून मतदान जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून गाडगे नगर परिसरातील संत गाडगेबाबा यात्रेत पथनाट्याच्या माध्यमातून

पथनाट्यातून मतदानाचा संदेश : संत गाडगेबाबा यात्रेत SVEEP उपक्रमांतर्गत प्रभावी जनजागृती Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावतीत निवडणूक तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची EVM स्टोअर व प्रशिक्षण केंद्रांना भेट

आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक भवन आणि आयटीआय कॉलेज येथे पाहणी दौरा केला. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन येथील ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) स्टोअरची सविस्तर

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावतीत निवडणूक तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची EVM स्टोअर व प्रशिक्षण केंद्रांना भेट Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची सविस्तर बैठक

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीड व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (एमसीएमसी)ची सविस्तर बैठक मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. ही बैठक निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. बैठकीत निवडणूक आचारसंहिता

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची सविस्तर बैठक Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत स्विप उपक्रमांना वेग; शिक्षण विभागाचा सखोल आढावा

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्विप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाची सविस्तर आढावा बैठक मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. ही बैठक निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती महापालिकेत स्विप उपक्रमांना वेग; शिक्षण विभागाचा सखोल आढावा Read More »

Scroll to Top