प्लास्टिक बंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावतीत व्यापारी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची जनजागृती कार्यशाळा
स्वच्छ, हरित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक अमरावती शहर घडविण्याच्या उद्देशाने तसेच महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा, २००६ आणि राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या अविघटनशील वस्तूंवरील वापरबंदीबाबत जारी केलेल्या अधिसूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ३० जून) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहरातील व्यापारी, हॉटेल, […]









