प्रथमेश तलाव व छत्री तलावाची पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी
अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर आज अमरावती शहरात घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात व्यापक नियोजन करण्यात आले होते. नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता यावे, यासाठी शहरातील विविध भागांत कृत्रिम विसर्जन टँक, तसेच प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव येथे कृत्रिम









