जनगणना अभियानात पहिल्या टप्प्याचे १०० टक्के काम पूर्ण; महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
अमरावती महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल आज शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते संबंधित झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता आशिष अवसरे व त्यांच्या कर्मचारीवर्गाचा, झोन क्र. ४ चे […]









